Nanda Khare
Antajichi Bakhar
- Author Name:
Nanda Khare
-
Book Type:

- Description: मग माझा पक्ष कोणता? तर वाटे, महाशयांचा पक्ष, पुरबीचा पक्ष. रामचंद्रपंत पंडितांचा पक्ष. वहिनींचा पक्ष. कविराज, गोपाळा, अगदी मोहंतीदेखील माझे पक्षकार होणेस लायक! परंतु हा तर केवळ जगणार्यांचा, जगूं पाहाणार्यांचा पक्ष! यांचे हातीं ना सत्ता, ना सैन्य. तर असा माझा नामर्दांचा पक्ष! एकामागोन एक नामर्दगीच भोगणें हातीं. वहिनीसाहेब जळाल्या. फिरंग्यास मध्यें पडणेसाठी हालचाल करावी, वाटलें. मज नाहीं. पंतांस खोटें नाटें सांगोन अलीवर्दीनें मारिलें. मज सूड घ्यावा, वाटलें नाहीं. सिराजानें नाहीं नाहीं तें केलें. त्यास रोखणेचें धैर्य वोट्सांत. क्लाईव्हांत. वाटसनांत. कूटांत. माझ्यांत नव्हे. तर आतां परते महाराष्ट्रांत जावोन मीठ विकावें, हें बरें! इतिहासाला भव्य-दिव्य आभासी विश्वातून जमिनीवर आणणारी तिरकस शैलीतील ऐतिहासिक कादंबरी... Antajichi Bakhar : Nanda Khare अंताजीची बखर : नंदा खरे
Antajichi Bakhar
Nanda Khare
Darvin Aani Jivsrushtiche Rahasya
- Author Name:
Ravindra Rukmini Pandharinath +1
-
Book Type:

- Description: उत्क्रांतीचा सिद्धान्त ही मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन घडवून आणणारा हा सिद्धान्त डार्विनने मांडला, त्याला आता दीडशे वर्षे झाली आहेत. आजच्या गतिमान जगात ह्या सिद्धान्ताचं स्थान काय? आज तो कालबाह्य ठरला आहे का? त्याची पुनर्मांडणी करायला हवी का? माणसाच्या विकासात अधिक महत्त्वाचे काय, नैसर्गिक प्रकृती, की पालनपोषण? मार्क्सवाद आणि स्त्रीवाद या विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या विचारप्रणालींवर या सिद्धान्ताने काय प्रभाव पाडला? भारतीय विचारपरंपरेवर डार्विनचा काही परिणाम झाला का? जातिव्यवस्था आणि शेतीवरील अरिष्ट या भारताच्या दृष्टीनं कळीच्या मुद्यांबाबत हा सिद्धान्त काय सांगतो? रंगभेद आणि जातिभेद यांचं तो समर्थन करतो का? वैज्ञानिक शेती ही उत्क्रांतीविरोधी आणि पर्यायानं निसर्गविरोधी आहे का? गेल्या वीस-पंचवीस वर्षांत उदयाला आलेल्या मेंदूजैवविज्ञानाच्या अनेक अंगांना हा सिद्धान्त कसा काय लागू पडू शकतो ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारा ग्रंथ. महाराष्ट्रातल्या नव्या पिढीतल्या बारा विद्वान आणि व्यासंगी लेखकांनी सिद्ध केलेला. - सुबोध जावडेकर Darvin Aani Jivsrushtiche Rahasya : Nanda Khare,Ravindra Rukmini Pandharinath डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य : संपादक : रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ । नंदा खरे