Deepa Deshmukh
Business Books
- Author Name:
Deepa Deshmukh
-
Book Type:

- Description: यशस्वी होणं म्हणजे हव्या त्या इच्छा, बघितलेली स्वप्नं पूर्ण होणं. यशस्वी होणं म्हणजे पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती प्राप्त होणं. पण यशस्वी होताना यश म्हणजे केवळ पैसा नाही, यश म्हणजे फक्त संपत्ती नाही तर सर्वार्थाने यशस्वी होताना तुम्ही एक चांगला माणूस म्हणून कसे घडता याचं उदाहरण ‘बिझनेस बुक्स' मधली ही 30 पुस्तकं तुमच्यासमोर ठेवतात. आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी, समाजाभिमुख होण्यासाठी अशी पुस्तकं तुम्हाला बळ देतात. आपल्यामधल्या क्षमता ओळखण्यास शिकवतात आणि त्यावर मात करायलाही प्रवृत्त करतात. वाईट काळात तग धरून कसं राहायचं, वेळेचं आणि कामाचं नियोजन कसं करायचं याबद्दल ती सजग करतात. ‘बिझनेस बुक्स'मध्ये सामील झालेली, निवडलेली सगळीच पुस्तकं बेस्ट सेलर म्हणून जगभर गाजलेली आहेत. या पुस्तकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद होऊन ती जगभरातल्या कोट्यवधी वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. हे पुस्तक कोणी वाचावं? नव्याने उद्योग/व्यवसायात पाऊल टाकणाऱ्या तिने किंवा त्याने, संस्थे/संघटनेमध्ये नेतृत्व करणाऱ्याने, कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम बघणाऱ्याने, राजकारणात चांगला नेता म्हणून तयार होणाऱ्याने, चांगला सुजाण नागरिक म्हणून घडणाऱ्या प्रत्येकाने अशा सगळ्यांनी हे पुस्तक वाचायला हवं. विद्यार्थी असो, वा गृहिणी असो, शिक्षक असो वा पालक असोत, व्यावसायिक असो वा उद्योजक असोत या सगळ्यांच्या खांद्यावर हलकी थाप देत मित्रत्वाचा सल्ला देणारं हे पुस्तक आपल्याला यशस्वी होण्याचा मार्ग दाखवेल. मनोविकास प्रकाशित आणि दीपा देशमुख लिखित ‘बिझनेस बुक्स' या पुस्तकाद्वारे जगप्रसिद्ध पुस्तकांसोबत मैत्री करत यशदायी सैर करू या. Business Books | Deepa Deshmukh बिझनेस बुक्स | दीपा देशमुख
Business Books
Deepa Deshmukh
Jag Badalnare - Granth
- Author Name:
Deepa Deshmukh
-
Book Type:

- Description: जग बदलणारे ग्रंथ माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. माणसाच्या वाटचालीत स्त्रीवर लादलेलं दुय्यमत्व झुगारण्यासाठी तिनं संघर्ष केला आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी ठाम भूमिका घेतली. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली, कधी त्यानं विज्ञानाची साथ घेतली, तर कधी तंत्रज्ञानाची मदत घेतली. कधी त्यानं स्वत:ला समजून घेण्यासाठी मानसशास्त्राची शाखा निर्माण केली. कधी त्यानं व्यवहार सुरळीत चालण्यासाठी अर्थशास्त्राची सोबत घेतली. कधी त्यानं आपली मूल्यं विकसित करताना त्यांना तत्त्वज्ञानाची जोड दिली. या सगळ्या गोष्टींचा दस्तावेज 'ग्रंथ' रुपात जतन करण्याची प्रक्रिया त्यानं सुरू ठेवली. त्यामुळेच जगभरात आज धर्म, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चरित्र अशा अनेक शाखांमधलं लिखाण ग्रंथांच्या रुपानं निर्माण झालं. यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला. यातले निवडक ५0 ग्रंथ घेऊन त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न 'ग्रंथ' मध्ये करण्यात आला आहे. कुतूहल, ज्ञानाची आस असणाऱ्या प्रत्येकानं आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दीपा देशमुख लिखित 'ग्रंथ' वाचायलाच हवा. Jag Badalnare - Granth -Deepa Deshmukh जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख
Jag Badalnare - Granth
Deepa Deshmukh
Directors
- Author Name:
Deepa Deshmukh
-
Book Type:

- Description: लाखो/करोडो प्रेक्षकांच्या मनाला दशकानुदशकं भुरळ पाडणारं माध्यम म्हणजे चित्रपट. मनोरंजनातून लोकांना सजग आणि जागरूक करणारं सशक्त माध्यम म्हणजेही चित्रपटच. अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गज बुद्धिवंतांपर्यंत आपली स्वप्नं रंगवण्याची, घटकाभर वास्तवाचा विसर पाडण्याची ताकद या माध्यमात आहे. चित्रपट बघताना कधी आपण आपलंच प्रतिबिंब बघतो आहोत असं वाटतं. चित्रपटातल्या पात्रांच्या सुखदु:खांशी, वेदनांशी, परिस्थितीशी आपण एकरूप होतो. कधी आपण भारावून जातो, तर कधी अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. चित्रपट निर्मिती ही एक सांघिक कृती आहे, तिच्यामागे अनेकांचे परिश्रम असतात असं आपण म्हणत असलो, तरी ‘कॅप्टन ऑफ द शीप' हा त्या चित्रपटाचा दिग्दर्शक असतो हेच खरं. हा दिग्दर्शक किती तरल आहे, किती सर्जनशील आहे यावर त्या चित्रपटाची परिणामकारकता अवलंबून असते. दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशन प्रकाशित ‘डायरेक्टर्स' या पुस्तकामध्ये सत्यजीत रे, व्ही. शांताराम, राज कपूर, बिमल रॉय, गुरू दत्त, हृषिकेश मुखर्जी आणि श्याम बेनेगल अशा काही निवडक दिग्दर्शक मंडळींचा अंतर्भाव केला आहे. ‘डायरेक्टर्स' हे पुस्तक चित्रपटांबद्दल बोलतं, तेव्हा वाचकाला त्यात रमवून टाकतं. दिग्दर्शकांबद्दल बोलतं, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी कसा सामना करावा ते सांगतं. यातल्या कलंदरांबद्दल बोलतं, तेव्हा आपलं जगणं अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण कसं करायचं हे सांगतं. ज्याप्रमाणे दृश्यानुभवातून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद चित्रपटांमध्ये असते, त्याचप्रमाणे अक्षरानुभवातून ते कथानक, ते प्रसंग, तो काळ आणि त्या व्यक्तींना जिवंत करण्याची लेेखिकेची ताकद या पुस्तकामधून प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे काळाच्या पुढे बघायला लावणारे, मानवता हाच खरा धर्म असं सांगणारे, सत्य, अहिंसा आणि प्रेम यांचा विचार रुजवणारे चित्रपट आणि त्यांचे दिग्दर्शक यांची ओळख रसाळ, ओघवत्या आणि सोप्या भाषेत एक रसिक आणि आस्वादक म्हणून लेखिकेने करून दिली आहे. डायरेक्टर्स । दीपा देशमुख Directors । Deepa Deshmukh
Directors
Deepa Deshmukh
Offers
Best Deal
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.