
Business Books
Publisher:
Manovikas Prakashan LLP
Language:
Marathi
Pages:
248
Country of Origin:
India
Age Range:
18-100
Average Reading Time
496 mins
Book Description
यशस्वी होणं म्हणजे हव्या त्या इच्छा, बघितलेली स्वप्नं पूर्ण होणं. यशस्वी होणं म्हणजे पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती प्राप्त होणं. पण यशस्वी होताना यश म्हणजे केवळ पैसा नाही, यश म्हणजे फक्त संपत्ती नाही तर सर्वार्थाने यशस्वी होताना तुम्ही एक चांगला माणूस म्हणून कसे घडता याचं उदाहरण ‘बिझनेस बुक्स' मधली ही 30 पुस्तकं तुमच्यासमोर ठेवतात. आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी, समाजाभिमुख होण्यासाठी अशी पुस्तकं तुम्हाला बळ देतात. आपल्यामधल्या क्षमता ओळखण्यास शिकवतात आणि त्यावर मात करायलाही प्रवृत्त करतात. वाईट काळात तग धरून कसं राहायचं, वेळेचं आणि कामाचं नियोजन कसं करायचं याबद्दल ती सजग करतात. ‘बिझनेस बुक्स'मध्ये सामील झालेली, निवडलेली सगळीच पुस्तकं बेस्ट सेलर म्हणून जगभर गाजलेली आहेत. या पुस्तकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद होऊन ती जगभरातल्या कोट्यवधी वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. हे पुस्तक कोणी वाचावं? नव्याने उद्योग/व्यवसायात पाऊल टाकणाऱ्या तिने किंवा त्याने, संस्थे/संघटनेमध्ये नेतृत्व करणाऱ्याने, कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम बघणाऱ्याने, राजकारणात चांगला नेता म्हणून तयार होणाऱ्याने, चांगला सुजाण नागरिक म्हणून घडणाऱ्या प्रत्येकाने अशा सगळ्यांनी हे पुस्तक वाचायला हवं. विद्यार्थी असो, वा गृहिणी असो, शिक्षक असो वा पालक असोत, व्यावसायिक असो वा उद्योजक असोत या सगळ्यांच्या खांद्यावर हलकी थाप देत मित्रत्वाचा सल्ला देणारं हे पुस्तक आपल्याला यशस्वी होण्याचा मार्ग दाखवेल. मनोविकास प्रकाशित आणि दीपा देशमुख लिखित ‘बिझनेस बुक्स' या पुस्तकाद्वारे जगप्रसिद्ध पुस्तकांसोबत मैत्री करत यशदायी सैर करू या. Business Books | Deepa Deshmukh बिझनेस बुक्स | दीपा देशमुख